| Address: बोईसर ईस्ट, 401501 |
विषय: अतिरिक्त बिल व यूनिट आकरण्यात आलेल्या रक्कमेचा परतावा (रिफंड) मिळणे बाबत तसेच मिटर मध्ये डिसप्ले दिसत नसल्यामुळे बदलून मिळणेबाबत.
महोदय,
मी श्री. केवलकुमार वा. पाटील वरील उल्लेख केलेल्या पत्त्यावर राहत असून सदर फ्लॅट हा मी इण्वेस्ट्मेंट करण्याच्या उद्देदशाने घेतला आहे व सदर फ्लॅटवर मी पंधरा दिवसातून 1 ते 2 वेळाच येतो तसेच आम्ही दाम्पत्य ज्येष्ठ नागरिक (सीनियर सिटिजन) असून सततच्या आजारपणामुळे मुंबईत मुलीकडेच वास्तव्यास असतो. मी आपल्या निदर्शनास आणू देवू इच्छितो की, ऑगस्ट-2016 पासून माझे मीटर बंद / डिसप्ले दिसत नसल्या बाबत आजपर्यंत अनुक्रमे दिनांक.[protected],[protected],[protected],[protected] तसेच[protected] रोजी आपणाकडे लेखी तक्रार केली आहे. परंतु अजून पर्यंत संबंधित डिपार्टमेंट कडून कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही.
मी आपणास कळवू इच्छितो की, जुलै-2016 पर्यंत माझे मीटर चालू होते व डिसप्ले देखील व्यवस्थित दाखवत होता तसेच सर्व बिलाचा भरणा मी वेळेवर केलेला आहे परंतु ऑगस्ट-2016 पासून ते डिसेंबर-2018 पर्यंत म्हणजे तब्बल 29 महीने आपल्या विभागा मार्फत सरासरी 138 यूनिटचे बिल रुपये 850/- ते 1000/- पर्यंत आकरण्यात आले व ते माझ्याकडून भरण्यात आले असून संबधित पावत्या माझ्याकडे आहेत. परंतु जानेवारी-2019 मध्ये मला अचानक 4380 यूनिटचे 66720/- रुपयाचे बिल आकारण्यात आले त्या नंतर मी आपल्या कार्यालयात येऊन विचारणा केली असता रुपये 100/- बिल भरण्यास संगितले व त्याचा मी ऑनलाइन भरणा केला. परंतु फेब्रुवारी-2019 मध्ये परत 1553 यूनिटचे 22860/- रुपयाचे बिल मला पाठवण्यात आले त्या नंतर मी आपल्या कार्यालयात दि. 06.03.2019 रोजी येऊन विचारणा केली असता मला मीटर इन्सपेक्शन रीपोर्ट लागेल असे सांगण्यात आले त्यानुसार मी आपला कर्मचारी श्री. खेडकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दि. 06.03.2019 रोजी स्वतः येऊन सदर जागेवर इन्सपेक्शन केले व रीपोर्ट दिला त्यात असे निदर्शनास आले की, प्रत्यक्षपणे फक्त 4404 यूनिट मीटर डिसप्ले करत आहे. त्यानंतर मी माझ्याकडे असलेल्या भरणा करण्यात आलेल्या सर्व बिलांचा तपशील तपासाला असता मला खालील प्रमाणे आढळून आले.
Particular Units
Bill online & paid up to July-16, display units was 2363
Aug-16 To Dec-18 charged average of 138 units P.M.
(29 Months x 138 Units) 4002
Total unit charged through bill by MSEB till date 6365
Actual reading as on 06.03.19 4404 As per Mr Khedekar's report 06.03.19
Excess unit charged till date 1961 1961 Units excess amount paid
वरील प्रमाणे तपासणी केली असता असे आढळून आले की, तब्बल 1961 यूनिटचे अतिरिक्त बिल आपल्या कार्यालया मार्फत आकारण्यात आले व ते माझ्याकडून भरणा करण्यात आले व हा सर्व तपशील मी आपले कर्मचारी श्री. आशीष व श्री. माने साहेब यांच्या निदर्शनास आणून दिला व ते त्यांनी तुम्हच्या बूक तपशीलाशी तुलना करून मान्य ही केले व मला सांगण्यात आले की, पुढील महिन्यापासून बिल व्यवस्थित दुरूस्ती करून येईल परंतु मार्च-2019 चे बिल मिळाले असता ते तब्बल 44020/- रुपयांचे आले आहे तशी लेखी तक्रार मी दिनांक २२.०३.२०१९ रोजी आपल्या कार्यालयात दिली आहे तसेच मला तोंडी आश्वासन देण्यात आले की पुढील महिन्यात दुरूस्ती करून बिल पाठवण्यात येईल, ही आहे मार्च -2019 पर्यंतची परिस्थिति परंतु एप्रिल-२०१९ चे बिल मिळाले असता ते 44820/- रुपयांचे आले आहे म्हणजे अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारची दखल आपल्या अथवा कार्यालयामार्फत घेतली गेली नाही.
तसेच मी आपल्या निदर्शनास आणू देऊ इच्छितो की, मी दिनांक 22.04.2019 रोजी स्वतः माझ्या मिटर ची फोटो इमेज काढली असता चालू रीडिंग 4571 यूनिट अशी दाखवते त्याची छायाप्रत मी सोबत जोडत आहे. म्हणजे एकंदरीत परिस्थिति लक्षात येईल ती खालील प्रमाणे असेल.
Summary
Particular Units
Bill online & paid up to July-16, display units was 2363
Add Aug-16 To Dec-18 average of 138 units P.M. (29 Months x 138 Units) 4002
Total Total unit charged through bill by MSEB till date 6365
Less Actual reading as on 22.04.19 4571 As per meter image attached 22.04.2019
Excess unit charged till date 1794 1794 Units excess amount paid
तरी मी महोदयाना विनंती करतो की, वरील दिलेला तपशील तपासून योग्य ती दखल घेऊन 1794 यूनिट ची अतिरिक्त भरणा रक्कम मला परत (रिफंड) मिळण्यासाठी सहकार्य करावे व पुढील येणार्यात बिलांमध्ये योग्य ती अंतिम फेरफार करण्यात यावी जेणेकरून आम्ही ज्येष्ठ नागरिक असल्याकारणाने व वयोमानांनुसार होत असलेल्या आजारपणामुळे आम्हाला सतत आपल्या कार्यालयात फेर्या मारण्यामुळे होणारा त्रास टाळता येईल. तसेच मी विनंती करतो की, जर मीटर मध्ये काही प्रॉब्लेम असतील तर मला जुना मीटर बदलून नवीन मीटर देण्यात यावा.
वरील सर्व प्रकार लक्षात घेऊन योग्य ती उपाययोजना करण्यात येईल अशी अपेक्षा.
सोबत:
1) एप्रिल-2019 महिन्याच्या बिलाची छायाप्रत
2) फोटो इमेज मिटर रीडिंग 22.04.2019
कळावे आपला विश्वासू,
केवलकुमार वासुदेव पाटील
Mahadiscom / MSEB / MSEDCL customer support has been notified about the posted complaint.
I'm from akola old City in my area all street light are on hole day. It's not only lost a electricity but also consume unite dividing in costumer bill so I hope you all lights will be off and save electricity.
M.R.Ingle